Site icon

नाशिक : अंबादास दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा टाहो

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
वंजारवाडी येथे चार दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पावसामुळे गावासह शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी (दि. 5) या भागाची पाहणी केली.

या वेळी अनेक शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडत दानवे यांना निवेदने सादर करीत नुकसानभरपाईची मागणी केली. या निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे बांध फुटून काकडी, टोमॅटो, भात, सोयाबीन आदी पिके वाहून गेली. तसेच शेतीतील माती वाहून गेल्याने शेती करण्यासाठी राहिली नाही. ट्रिप पाइपलाइन, इलेक्ट्रिक मोटार, शेतीपूरक साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेले.

गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य वाहून गेले. गावातील अपंग व्यक्ती माजी सैनिक गोपाळा तुकाराम सामोरे यांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेली टपरी, फ्रीज, शैक्षणिक साहित्य हेसुद्धा वाहून गेले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार योगेश घोलप, सरपंचांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : अंबादास दानवे यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा टाहो appeared first on पुढारी.

Exit mobile version