
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील आनंदऋषी शाळेतली अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अनिल बाबु राठोड यांनी ही तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, माझ्याकडे शिक्षणासाठी असलेेल्या अल्पवयीन मुलाचे आनंदऋषी शाळेतून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले असून शाळेत गेल्यानंतर तो घरी आला नसल्याचे म्हटले होते.
त्याची दखल घेत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने शोध सुरू केला. त्यावेळी मुलाचे नातेवाईक व पोलिसांना अपहरण झालेला मुलगा जळगाव जिल्हयातील चाळीसगाव बस स्थानकावर सापडला. मुलाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. त्यावेळी तो मुलगा आपल्या आई वडिलांच्या घरी म्हणजेच चाळीसगाव येथे जात होता. असे समजले त्यामुळे मुलाचे अपहरण झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
- पुणे-सातारा रस्त्यावर अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
- अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; खामुंडी जवळच्या बदगी घाटातील घटना
- बुलढाणा : एस.टी.बसच्या पत्र्यामुळे दोघांचे हात तुटले; मलकापूर जवळील दुर्घटना
The post नाशिक : अखेर अपहरण नाट्यावर पडदा ; सापडल्यानंतर मुलानेच केला मोठा खुलासा appeared first on पुढारी.