अगस्ती बंधा-यात बुडून मृत्यू,www.pudhari.news

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील रायते शिवारात अगस्ती नदीवरील बंधार्‍यामध्ये दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

मंगळवारी (दि. 30) दुपारी चारच्या सुमारास भाटगाव येथील रहिवासी दीपक मिटके (18) हा आतेभाऊ तुषार उगले (20) याच्याबरोबर पोहण्यासाठी बंधार्‍यात गेला होता. परंतु, दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अथक प्रयत्न करून त्यांना बाहेर काढले. तुषार हा शिक्षणानिमित्त दीपकच्या घरी राहात होता. येवला शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : अगस्ती बंधार्‍यात बुडून दोन युवकांचा दुुर्दैवी मृत्यू appeared first on पुढारी.