नाशिक : अजमेर शरीफ उरूससाठी छायाचित्रकाराचे तीस वर्षांपासून योगदान

उरुस www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या रविवारी (दि.29) अजमेर येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती ऊर्फ ख्वाजा गरीब नवाज यांचा उरूस साजरा होणार आहे. उरूसमध्ये सामील होण्यासाठी 1996 सालापासून बसप्रवास करीत जुने नाशिक येथील खडकाळी भागातील छायाचित्रकार हे भाविकांच्या सोयीसाठी पर्यटनाची सोय उपलब्ध करून देत आहेत. यावर्षीदेखील बुधवारी (दि.25) मार्गक्रमण करत धार्मिक स्थळांचे दर्शन घेत अजमेर शरीफ येथील उरूसला हजर राहण्यासाठी बसने प्रवासासाठी प्रारंभ होणार आहे.

इस्लामी कालगणनेनुसार रज्जब-उल-मुरज्जब महिन्याच्या 6 तारखेला राजस्थानमधील अजमेर येथील सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याचा उरूस साजरा केला जातो. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील लाखो भाविक हजेरी लावत असतात. नाशिक जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी उरूससाठी अजमेरला जात असतात. नाममात्र सवलतीच्या दरात भाविकांच्या सोयीसाठी सुमारे 27 वर्षांपासून खडकाळी भागातील छायाचित्रकार सलीम खान या धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिक ते अजमेर याप्रमाणे बसप्रवासाची सोय उपलब्ध करून देत आहेत. कोरोना कालावधीमध्ये हा प्रवास विस्कळीत झाला होता. मात्र यंदा पुन्हा जल्लोषात रविवारी (दि.29) उरूसनिमित्ताने बुधवारी (दि.25) रात्री 10 वाजता जुने नाशिक येथून बसप्रवासासाठी प्रारंभ होणार असल्याने भाविकांनी हजेरी लावण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अजमेर शरीफ उरूससाठी छायाचित्रकाराचे तीस वर्षांपासून योगदान appeared first on पुढारी.