नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष

भगूर गर्दी www.pudhari.news

नाशिक (देवळाली / विंचुरी दळवी) : पुढारी वृत्तसेवा

देवळाली येथील विंचुरी दळवी भगुर याठिकाणी दारणा नदीपुलावर रविवारी, दि.23 राञीच्या सुमारास अज्ञाताने सुमारे चार जनावरांची हत्या करुन नदीशेजारील शेतात अवशेष फेकून दिल्याची घटना घडली आहे.

परिसरातील नागरीकांच्या हे लक्षात येताच नागरीकांनी संतप्त होत रस्ता रोको करुन पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले असून हत्या करुन फरार झालेल्या व्यक्तीचा शोध लावण्यात येईल असे आश्वासन देत नागरिकांची समजूत काढण्यात आली परंतु, नागरीकांनी काहीही ऐकण्याच्या मनस्थीतीत नसण्याचा पवित्रा हाती घेत रास्ता रोको कायम ठेवल्याने भगुर पांढुलीॅ रस्त्यात वाहतुक खोळंबली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अज्ञाताचा जनावरांवर हल्ला; शेतात फेकून दिले अवशेष appeared first on पुढारी.