
नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील बेज शिवारात अज्ञाताने पोल्ट्रीफार्मच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकल्याने ५०० पक्षी (कोंबड्या) मृत्यूमुखी पडल्या आहेत. बाकीचे पक्षी (कोंबडी) अस्वस्थ आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत संशयित अज्ञात इसमावर कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कळवण तालुक्यातील नवीबेज शिवारातील शेतकरी सचिन रामचंद्र रौंदळ गट नं १९०/२ यांच्या पोल्ट्रीफार्मच्या पाण्याच्या टाकीत रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने ४८८० पक्षी (कोंबड्यांना) विषबाधा झाली. त्यापैकी ४०० मयत काेंबड्या झाल्याने कोंबडी पालनकर्त्याचे जवळपास एक लाखा रुपयाचे नुकसान झाले आहे. सचिन रौंदळ कुक्कुटपालन व्यवसाया बरोबरच शेती व्यवसाय करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गट नं. 190/2 मध्ये सन 2005 पासून करार पध्दतीने दोन जणांच्या नावे त्यांनी पोल्ट्रीफॉर्म टाकले. सध्या दोन्ही पोल्ट्रीफॉर्ममध्ये एका खाजगी कंपनीकडून ४८८० हजार पक्ष्यांचे पालनपोषण सुरु होते. मात्र रात्रीच्या वेळी संशयित अज्ञाताने पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकून ४०० कोंबड्या मेल्या आहेत. एक एक सेकंदाला एक कोंबडी मृत्यूमुखी पडत आहेत. तर बाकीचे पक्षी (कोंबडी) अस्वस्थ आहेत. कोंबड्याच्या तोंडातून पांढरा फेस येत असल्याने या कोंबड्या देखील मृत होण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा:
- नाशिक : गिरणा डॅम धरणावरील पुलावरून पायी जाण्यास मुभा द्यावी – ग्रामस्थांचे निवेदन
- Cheetah Dies : कुनो नॅशनल पार्कमध्ये तिस-या चित्त्याचा मृत्यू, नर चित्त्याच्या हल्ल्यात गमावला जीव
- MS Dhoni Retirement: ‘मी ट्रॉफी जिंकून…’, धोनीने रिटायरमेंटचा प्लॅन केला जाहीर
The post नाशिक : अज्ञाताने पिण्याच्या पाण्यात टाकले विषारी औषध; 500 कोंबड्याचा मृत्यू appeared first on पुढारी.