नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अपघात

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील वाहेगावसाळ येथील गांगुर्डे वस्तीजवळ मनमाड – लासलगाव रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संदीप उत्तम आहेर (३५, आनंदवाडी, मनमाड ) हे लासलगाव येथे दुचाकीने (एमएच १७, एके ४०६९) गेले होते. तेथील काम आटोपून ते लासलगाव – मनमाड रस्त्याने घरी परतत असताना, चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील गांगुर्डे वस्तीजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात संदीप आहेर यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यावर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेबाबत आकाश अरुण शिंदे (२८, आंबेडकर चौक, मनमाड) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चांदवड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.