
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर बस स्थानक परिसरातून अज्ञाताने एका महिलेच्या हातातील अडीच तोळ्यांची सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना बुधवार, दि. 28 दुपारच्या सुमारास घडली. पोपट विठ्ठल गोसावी (77, रा. स्वामी समर्थनगर, सिन्नर) व त्यांची पत्नी बस स्थानकातून घरी येत होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने गोसावी यांच्या पत्नीच्या हातातील सोन्याची अडीच तोळ्यांची बांगडी चोरुन नेली. बराच वेळानंतर गोसावी यांना हातात बांगडी नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, बांगडी मिळून न आल्याने त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात येत अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल केली. हवालदार पवार करत पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा:
- चीन क्वारंटाईन नियम शिथिल करणार
- नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या
- पिंपरी : आगामी निवडणुकांत ‘रेड झोन’चा मुद्दा गाजणार?
The post नाशिक : अडीच तोळ्यांची बांगडी पळवली appeared first on पुढारी.