
नाशिक : बस प्रवासात चोरट्याने वृद्धेकडील सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना जुने सीबीएस परिसरात घडली. या प्रकरणी सीताबाई मंगळू गबाले (65, रा. मुलुंड, मुंबई) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. इगतपुरीला जाण्यासाठी जुन्या सीबीएसला बसमध्ये बसल्यानंतर चोरट्याने त्यांचा लक्ष्मीहार लंपास केला.
हेही वाचा :
- रत्नागिरी : जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी
- Pradeep Patwardhan : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
- चक्क हिरव्या बलकाची अंडी!
The post नाशिक : अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार बसप्रवासात केला लंपास appeared first on पुढारी.