नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र

ग्रामपंचायत

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील परमोरी ग्रामपंचायतीचे सरपंच जयराम दिघे यांना अप्पर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रसंगी अपात्र ठरवले आहे. माजी सरपंच नवनाथ काळोगे यांनी याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. Nashik

विद्यमान सरपंच जयराम दिघे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असताना त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी सरकारी जागेत बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी सदर विवाद अर्ज मान्य करत सरपंच दिघे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. तक्रारदार यांच्यातर्फे ॲड. सतीश भगत यांनी काम पाहिले. Nashik

हेही वाचा 

The post नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र appeared first on पुढारी.