नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन

अदानी विरोधात आंदोलन,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सिडको ब्लॉक तर्फे सिडकोतील स्टेट बॅक चौकात अदानी समुहाच्या विरोधात पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. अदानी समूहाने स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयाच्या कर्जासंबधी आणि अदानी समुहाच्या शेअर ढासललेल्या परिस्थितीवर सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी व सर्वसामन्य जनतेला दिलासा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.

आंदोलनाचे प्रास्तविक अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक अण्णा पाटील, लक्ष्मण  जायभावे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात  भरत पाटील, गौरव सोनार, अशोक लहामगे, चारुशीला शिरोडे, इम्रान अन्सारी, देवेंद्र देशपांडे, नाना भामरे, संतू पाटील जायभावे, स्वप्नील पाटील, नंदकुमार कर्डक, धोंडीराम बोडके, धोंडीराम आव्हाड, हनिब बशीर, दाऊद शेख, सुभाष पाटील, सुरेश जाधव, देवराम सैदाणे, रमेश बागुले, संतोष ठाकूर माजी नगरसेविका  आशा तडवी, वस्तला खैरे, निशिका गुप्ता, प्रिया ठाकूर, समिना पठाण, सझिया शेख, गुड्डी आप्पा, सोफिया सिद्धीकि, दर्शन पाटील, नितेश निकम, मनोज साठे, सनी सूर्यवंशी, शाहरुख शाह, इसाक कुरेशी, अनिल बहोत, देवराम सैदाणे, रमेश बागुले, मिर्झा ताई, गौरव सोनार, नितीन अमृतकर, सचिन दीक्षित, सुरज चव्हाण यांनी सहभाग घेतला. आभार संतोष ठाकूर यांनी मांनले.

हेही वाचा :

The post नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन appeared first on पुढारी.