नाशिक : अधिक मासानिमित्त ब्रह्मगिरी फेरी मार्ग फुलला

ब्रम्हगिरी फेरी मार्ग नाशिक,www,pudhari.news

ञ्यंबकेश्वर : नामा म्हणे प्रदक्षिणा… त्याच्या पुण्याची नाही गणना… टाळमृदुंगाच्या साथीवर असा घोष करीत फेरी करणारे भाविक सध्या त्र्यंबकमध्ये नजरेस पडत आहेत. ऐतिहासिक आणि पुराण काळापासून प्रसिध्द असलेली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. अधिकमासाचा पर्वकाल साधत हजारो भाविक फेरी मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. सोमवार, शनिवार, पंचमी, अष्टमी, एकादशी या दिवसांना जास्त गर्दी असते.

संत निवृत्तीनाथांना योगीराज गहिनीनाथाचा अनुग्रह लाभला त्या प्रदक्षिणा मार्गावर जाण्यासाठी भाविकांची ओढ दिसून येते. पुढील आवडयात दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार प्रदक्षिणा मार्गावर गर्दीचा उच्चांक राहील असे दिसते.

प्रशासनाचे दुर्लक्ष

फेरी मार्गावर मोठ मोठे खड्डे झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता फुटला आहे. भक्तांच्या पायाची चाळण होत आहे. त्यापेक्षा पुर्वी असलेला निसर्गत: तयार झालेला पायवाटेचा मार्ग केव्हाही चांगला होता असे भाविकांचे म्हणने आहे. या रस्त्यावर लावलेले पथदिप बंद पडले आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांची बैठक घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अधिक मासानिमित्त ब्रह्मगिरी फेरी मार्ग फुलला appeared first on पुढारी.