
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणित विषय म्हटला की अवघड हा शब्द समोर आल्याशिवाय राहत नाही. मात्र, हाच विषय वेगवेगळ्या प्रयोगांमधून शिकविल्यास त्यात रुची निर्माण होते अन् अवघड वाटणारा विषय सोपा होता. असाच काहीसा प्रयोग सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार बालक मंदिर शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला. निमित्त होते गणित सप्ताहाचे.
शाळेच्या वतीने 19 ते 24 डिसेंबरदम्यान शाळेत गणित सप्ताहाचे आयोजन केले होते. सप्ताहादरम्यान विविध उपक्रम राबविले गेले. त्यामध्ये वजनमापे प्रात्यक्षिके, भाजीबाजार, पाढे पाठांतर स्पर्धा आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताचे धडे दिले गेले. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बेरीज-वजाबाकी उदाहरणांचा सराव तसेच इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणिताचे अध्यापन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील गणित विषयाची भीती कमी होऊन त्यांच्यात गोडी निर्माण झाली. वैदिक गणिताचे अध्यापण शिक्षिका मनीषा जोशी यांनी केले, तर सप्ताहाचे नियोजन भाग्यश्री पाटोळे यांनी केले. मुख्याध्यापिका नीता पाटील व शाळेच्या समन्वयक स्वाती गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा:
- जनार्दन रेड्डींकडून नव्या पक्षाची घोषणा
- Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा
- नगर : पन्नाशीतील दाम्पत्याची सुवर्ण भरारी ; राज्यस्तरीय चॅम्पियन्स स्पर्धेत दोघांनाही सुवर्णपदके
The post नाशिक : …अन् अवघड गणित विषय झाला सोपा appeared first on पुढारी.