Site icon

नाशिक : अन् म्हणून रस्ता दुभाजकावर अशी फसली कार…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कॉलेज रोडवरील एका पेट्रोल पंपासमोरील रस्ता दुभाजकावर एक कार फसली. रस्त्यावरील पथदीपांअभावी प्रकाश कमी असल्याने कारचालकास दुभाजकाच्या उंचीचा अंदाज आला नाही. त्यातच दुभाजकावरून त्याने कार वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कार फसल्याचे बोलले जात आहे. कार दुभाजकात अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

कॉलेजरोड परिसरातील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर वाहतूक वर्दळ कायम असते. रस्त्याच्या बाजूला वृक्ष आणि खाद्यपदार्थांची गाड्या उभ्या असतात. त्यामुळे या पथदिपांचा प्रकाश कमी असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहतूक कोंडीही नेहमी असते. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी समस्या सोडवण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून उपाययोजना झालेली नाही. रविवारी रात्री अपुऱ्या प्रकाश योजनेमुळे दुभाजकाचा अंदाज न आल्याने कार दुभाजकात फसल्याचे बोलले जात आहे. वाहन मधोमध फसल्याने बराचवेळी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली. या रस्त्यावरील जास्त प्रकाशाचे पथदीप बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अपघाताची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : अन् म्हणून रस्ता दुभाजकावर अशी फसली कार... appeared first on पुढारी.

Exit mobile version