नाशिक : अपघातात एका वृद्धेसह युवकाचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका वृद्धेसह युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाहनचालकांविरोधात आडगाव व सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ दुचाकीने धडक दिल्याने वृद्धेचा मृत्यू झाला. रामनाथ चंद्रभान काकड (७६, रा. जायगाव, ता. सिन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी अंजनाबाई काकड (७०) या गुरुवारी (दि.१०) दुपारी साडेबाराच्या सुमारास जनार्दन स्वामी मठाकडे पायी जात होत्या. त्यावेळी औरंगाबाद चांदोरीकडून नाशिकच्या दिशेने ऋषिकेश भाऊलाल कोकाटे (२०) हा एमएच १५ एफएच ४०७५ क्रमांकाच्या दुचाकीवरून येत होता. आयकॉन टाईल्ससमोर ऋषिकेशने अंजनाबाई यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यात अंजनाबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात ऋषिकेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत अशोकस्तंभाजवळी मल्हारखान झोपडपट्टीजवळ रविवारी (दि.१३) रात्री अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. अजय कैलास ढगे हे एमएच १५ एचएन ३९७३ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून कट मारून निघून गेला. मात्र त्यात ढगे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना अजयचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अपघातात एका वृद्धेसह युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.