नाशिक : अपघातात दुर्मीळ भारद्वाज पक्ष्याचा मृत्यू

पक्षी www.pudhari.news

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
घोटी-सिन्नर महामार्गावर वाहनाच्या धडकेत भारद्वाज पक्षी जखमी झाला. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे महामार्गावरून जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ जखमी पक्ष्याला घोटी येथे आणले. मात्र, त्यापूर्वीच भारद्वाज पक्ष्याचा अंत झाल्याने किर्वे यांच्यासह पक्षिप्रेमी भावुक झाले.

भारद्वाज पक्षी उडत उडत रस्ता ओलांडत असताना वेगाने जाणार्‍या वाहनाच्या काचेवर आदळला आणि खाली पडला. पक्षिप्रेमी किर्वे यांनी ही घटना बघितली. तरफडत असलेल्या भारद्वाज (कुंभार कुकडा) पक्ष्याला अलगद उचलत तत्काळ उपचारांसाठी आणले. मात्र, तत्पूर्वीच भारद्वाज पक्ष्याचा अंत झाला. एक पक्ष्यासाठी त्याचे प्राण वाचविण्यासाठी किर्वे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु दुर्दैवाने उपचाराआधीच जखमी पक्ष्याने प्राण सोडले. किर्वे यांच्यासह पक्षिप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.

हेही वाचा:

The post नाशिक : अपघातात दुर्मीळ भारद्वाज पक्ष्याचा मृत्यू appeared first on पुढारी.