नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या

आग,www.pudhari.news

नाशिक : मुंबई नाका परिसरातील हॅपी टाइम्स हॉटेल येथे अभियांत्रिकी पदवीधराने स्वत:स जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.14) सकाळी उघडकीस आली. तौसिफ हबीब पठाण (35, रा. साकोरी, राहता, जि. अहमदनगर) असे या युवकाचे नाव आहे. मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ याने गुरुवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान खोलीत स्वत:ला जाळून घेतले. तौसिफ हा घरातून न सांगता नाशिकला आला होता.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून आई-वडिलांसाठी काही करता न आल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

हेही वाचा :

The post नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या appeared first on पुढारी.