नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता

शरीरसौष्ठव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी येथे आयोजित दादा श्री २०२२ शरीरसौष्ठव स्पर्धेत अमीन अन्सारी याने बाजी मारली आहे. तर उपविजेता म्हणून यश दबे याने यश संपादन केले. तसेच स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी रवी भागडे व बेस्ट पोजरचा उपविजेता पीयूष केदारे ठरला.

नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने इगतपुरी येथे युवा सेना उपतालुकाप्रमुख विनोद भागडे यांच्यातर्फे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन निवृत्ती भागडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजक विनोद भागडे, नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड, खजिनदार रवींद्र वर्पे, श्रीराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते, स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ११६ शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. सहा वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून गोपाळ गायकवाड, श्रीराम जाधव, दिनेश भालेराव, अमोल जाधव, अमन शेख, टेक्निकल जबाबदारी दिग्विजय गायकवाड, स्टेज मार्शल म्हणून विजय पाटील, रामदास पोमनार, विराज केदार यांनी भूमीका पार पाडली, तर रवींद्र वर्पे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विलास भगत, रितेश भडांगे, नांदगावसदोचे ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल असा…

५५ किलो वजनी गटात – चैतन्य दुबे (प्रथम), क्रिष्णा पिंगळे, समाधान कोळी, विक्रांत मोरे, सूरज चव्हाण

६० किलो वजनी गटात – आकाश दुबे (प्रथम), रजत ईघे, वाहिद शेख, विक्की गायकर, जितू कातोरे

६५ किलो वजनी गटात – रवि भागडे (प्रथम), कुणाल शेलार, अनिल बरकले, शाहरुख शेख, परवेज अत्तार

७० किलो वजनी गटात – गुलजार खान (प्रथम), रोशन जाधव, आदर्श पवार, समीर पवार, साहील शेख

७५ किलो वजनी गटात – अमीन अन्सारी (प्रथम), अशरफ कुरेशी, दर्शन वाघमारे, अजय निशाद, शरद गाढवे

७५ किलोवरील वजनी गट – यश दबे (प्रथम), शाहबाज शेख, नवनाथ बेजेकर, आकाश झाकणे, पीयूष केदारे,

हेही वाचा:

The post नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता appeared first on पुढारी.