नाशिक : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; सातपूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

बाल लैंगिक अत्याचार

सातपूर: पुढारी वृत्तसेवा
सातपूर प्रबुद्धनगर परिसरात गेल्या तीन वर्षापासून तेरा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीस वर्षीय युवकाच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडिताच्या वडिलांच्या तक्रारीनुसार 16 वर्षीय मुलगा घरात नाराजीच्या अवस्थेत वावरत असल्याच्या कारणावरून विचारणा करण्यात आली असता त्याने संशयित आरोपी गणेश मालू वाघमारे (30, रा. प्रबुद्धनगर) याच्याविरोधात वारंवार खाऊचे अमिष दाखवून तसेच पॉर्न व्हिडिओ दाखवून पिडीत 13 वर्षाचा असल्यापासून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच मारहाण करत असल्याची धक्कादायक माहिती सांगितल्याने पिडीताच्या वडिलांनी सांगितली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश वाघमारे यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुध्द पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; सातपूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.