
नाशिक : अल्पवयीन मुलासमोर अश्लिल हावभाव करून त्याचा विनयभंग केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण अडसरे असे या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात विनयभंगासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, बेळगाव ढगा परिसरातील एका हॉटेल जवळ संशयिताने २२ डिसेंबरला अश्लिल हावभाव करीत मुलाचा विनयभंग केला. तर कार फोडण्याची धमकी देत शिवीगाळ करीत मुलाच्या आईलाही धमकावले. याप्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीस बोलण्यासाठी बोलावत तिला चक्कर आल्याचा गैरफायदा घेत एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना हिरावाडीतील शक्तीनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडितेने संशयित समर्थ तुषार परदेशी (२०, रा. शक्तीनगर, हिरावाडी) याच्याविरोधात पोक्सोसह बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित समर्थ याने पीडितेस मंगळवारी (दि.२७) भेटण्यासाठी दुपारी बोलवले होते. त्यावेळी चर्चा करताना पीडितेस चक्कर आली. त्याचा गैरफायदा घेत समर्थने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- Nitin Manmohan : ‘लाडला’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन
- पिंपरी : महिन्याकाठी सहा हजार ज्येष्ठांचा एसटी प्रवास ; वल्लभनगर आगारप्रमुखांची माहिती
- Amol Mitkari Photo Tweet : उत्तरार्धातील बोलके चित्र… आमदार अमोल मिटकरींचे ‘कटआउट’वरील सूचक ट्विट चर्चेत
The post नाशिक : अल्पवयीन मुलासमोर अश्लिल हावभाव, सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा appeared first on पुढारी.