नाशिक : अल्पवयीन मुलींसह महिलांचा ओळखीच्यांकडूनच सर्वाधिक छळ

महिलांवर अत्याचार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलींसह महिलांना सर्वाधिक धोका ओळखीच्या व्यक्तींकडूनच असल्याचे वास्तव पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांच्या तपासणीतून समोर आले आहे. विनयभंग, बलात्कार, अत्याचार, मारहाणीसारखे प्रकार ओळखीच्यांकडून सर्वाधिक होत असून, काही प्रकरणांमध्ये नातलगांचाही समावेश दिसून येतो.

शहरात दाखल गुन्ह्यांनुसार पीडितांचा लैंगिक छळ हा ओळखीच्या व्यक्ती किंवा नातलगांकडून झाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सव्वादोन महिन्यांच्या काळातच शहरात विनयभंगाचे २४ व बलात्काराचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांमधील आरोपी हे पीडितेच्या शेजारचे, नातलग, ओळखीतील किंवा नोकरीच्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. मोजक्याच गुन्ह्यांमध्ये अनोळखी व्यक्तीने पीडितेची छेड काढल्याचे किंवा त्रास दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलींनाही त्यांच्या ओळखींच्या व्यक्तींकडून सर्वाधिक लैंगिक छळाला सामाेरे जावे लागत आहे. सोशल मीडियावरील ओळखीतून किंवा अज्ञानपणाचा गैरफायदा घेत आरोपी अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करत असल्याचे प्रकार शहरात घडले आहेत.

कौटुंबिक हिंसाचाराच्याही बळी

विवाहानंतर महिलांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे प्रकार समेार आले आहेत. चालू वर्षात ६ मार्चपर्यंत पतीसह सासरच्यांनी पैशांसाठी किंवा इतर कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी १२ विवाहितांनी पोलिसांकडे फिर्यादी दिल्या आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये विवाहितांनी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत.

लैंगिक अत्याचाराचे दाखल गुन्हे

वर्ष —- विनयभंग —- बलात्कार

२०२१ —- ९५ —- ७०

२०२२ —- १२२ —- ८०

१ जाने ते ६ मार्च २०२३ —- २४ —- १५

हेही वाचा :

The post नाशिक : अल्पवयीन मुलींसह महिलांचा ओळखीच्यांकडूनच सर्वाधिक छळ appeared first on पुढारी.