
ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीने नवजात बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार केल्याचा गुन्हा संशयीतावर दाखल झाला आहे. मात्र हा बालविवाहाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दिनांक 15 जुलै 2023 रोजी पिडीता ञ्यंबक उपजिल्हा रूग्णालयात प्रस्तुतीसाठी आली. मात्र त्यांनी तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले. तिथे तीने एका बाळाला जन्म दिला. तेथे असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रसुत महिला अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ञ्यंबक पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर महिला पोलीस हवालदारांनी जबाब नोंदवला असता संपूर्ण प्रकार उघड झाला. दरम्यान याबाबत पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप यांनी फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे कृष्णा लक्ष्मण धुम (वय 26, रा. बारीपाडा, हरसूल) याने एका अल्पवयीन मुलीस सन 2022 च्या उन्हाळ्यात लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाल्याने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण जगताप पुढील तपास करत आहेत.
सखोल चौकशीची मागणी
दरम्यान हा बालविवाहाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेचे भगवान मधे यांनी बालविवाह रोखण्याची जबाबदारी असलेल्या शासन यंत्रणेच्या निष्क्रिय कारभाराने हा प्रकार घडला आहे. तब्बल दिड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही याबाबत वाच्यता झाली नाही. मात्र आता प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता असल्याने अल्पवयीन मुलीला जबाब देण्यास सांगण्यात आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पिडीत मुलीला गर्भवती अवस्थेत शासन लाभ देणारे गावातील कर्मचारी यांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही, याबाबात आश्चर्य व्यक्त होत आहे. बालविवाह झाला असे निदर्शनास आले तर संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई होते ती टाळण्यासाठी हा बनाव असावा. यासाठी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.
हेही वाचा :
- भरधाव कारची धडक बसून दुचाकीवरील दोन तरुण ठार
- पुरवणी मागण्यांत अजित पवार गटाला झुकते माप
- भोर : मानवी हस्तक्षेपामुळे दरड कोसळण्यात वाढ
The post नाशिक : अल्पवयीन मुलीच्या प्रसुतीने खळबळ appeared first on पुढारी.