नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास

न्यायालय,www.pudhari.news

नाशिक : शाळेचे दप्तर शिवण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या 61 वर्षीय वृद्धास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. रोडू भागा वाघ (61, रा. लोहणेर, कुंभारवाडा, ता. देवळा) असे या आरोपीचे नाव आहे.

गावातीलच 11 वर्षीय पीडित मुलगी ऑक्टोबर 2018 रोजी आरोपी रोडू वाघ याच्याकडे फाटलेले दप्तर शिवण्यासाठी गेली होती. त्यावेळी वाघ याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानात नेत अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात वाघविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यात रोडू वाघ याने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी त्यास शिक्षा सुनावली.

हेही वाचा :

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 61 वर्षीय वृद्धास तीन वर्षे कारावास appeared first on पुढारी.