नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

गुन्हा www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
ओळखीचा फायदा घेत संधी साधू नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असताना बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयितावरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडीत अल्पवयीन मुलगी हि घरी एकटी असतांना आरोपी युनुस अकबर शेख याने ओळखीचा फायदा घेत तिच्या घरात जावून किचनमध्ये असतांना तिचा विनयभंग केला. तसेच ‘तू जर कोणाला काही सांगीतले तर तुझा वडीलांना मारुन टाकील’, अशी दमदाटी केली. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी आरोपीने फिर्यादीच्या घरी येत ती एकटी असतांना विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी युनुस अकबर शेख विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, पोलीस उपनिरीक्षक एल. के. धोक्रट यांच्यासह पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.