नाशिक : अवजड वाहनाने घेतला महिलेचा बळी

आम्रपाली सागर ढेंगळे www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दुचाकी व अवजड वाहनात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित गजानन इरान्ना राचेटी (वय 35 रा. इराण्णा देवी मंदिराजवळ, जवाहरनगर, विळी घरकुल, सोलापूर ) हा ट्रक ( केऐ 32 सी 6024)ने उपनगरकडून अशोका हॉस्पिटलकडे भरधाव वेगाने जात असताना सोमवारी दुपारी वडाळा गाव चौफुलीवर दुचाकीवरील महिला चालक आम्रपाली सागर ढेंगळे (वय 32, रा. सुभाष रोड, देवळाली, एम एच १५ एच व्ही ५९७०) यांच्या दुचाकीला पाठीमागून धडकला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस नाईक मन्सूर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालक संशयित गजानन इरान्ना राचेटी याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अवजड वाहतूकीचा प्रश्न कायम
इंदिरानगर, वडाळा, पाथर्डी या रस्त्याने गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी, यासाठी परिसरातील माजी नगरसेवक, समाजसेवक, नागरिक यांनी अनेक वेळा निवेदन दिले. तसेच आंदोलनदेखील केले. मात्र, अवजड वाहतूक रस्त्याने सुरूच आहे. अवजड वाहतूक बंद करण्यात आली असती तर कदाचित त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू होती.

हेही वाचा:

The post नाशिक : अवजड वाहनाने घेतला महिलेचा बळी appeared first on पुढारी.