Site icon

नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर मंगळवारी (दि १७) रोजी रात्री ३ च्या सुमारास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .

सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या ह्या दमदार कामगिरीने अवैद्य रित्या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सदर कारवाइची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप ,अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार -कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांना देण्यात येऊन पुढील कारवाई तहसीलदार विजय सूर्यवंशी करीत आहेत. याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दि १७ रोजी तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान पकडण्यात येऊन ते ,देवळा पोलीस स्टेशन आवारात जमा करण्यात आले आहेत.लोहोणेर गिरणा नदीपात्रातुन अवैध रित्या वाळू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी लोहणेर माळवाडी रस्त्यावर सापळा रचुन त्यांना 3 ट्रॅक्टर मधून गौणखनिज ( वाळु ) अवैध रित्या वाहतुक करतांना मिळुन आले.यावेळी पोलिसांना चालकांकडे कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना आढवुन आला नाही.यावरून सदर ट्रॅक्टर पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करुन मालक व चालकाचे नाव पत्ता घेवुन चालकांना सोडून देण्यात आले आहे . अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार देवळा पोलिसांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य व्यवसायांना चाप बसविला आहे . या धकड मोहीमचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

The post नाशिक : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version