Site icon

नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रकार थांबले नसल्याचे गौणखनिज शाखेने केलेल्या कारवायांमधून समोर आहे. गौणखनिज शाखेने एक एप्रिलपासून अवैध गौणखनिजविरोधात तब्बल १०४ कारवाया केल्या आहेत. याद्वारे माफियांना एक कोटी ८१ लाख ९९ हजार रुपयांचा दंड बजावला आहे.

गेल्या काही वर्षांपासून गौणखनिजाचे अवैध उत्खनन व चोरट्या वाहतुकीत वाढ झाली आहे. या घटनांमधून गौणखनिज माफिया गब्बर झाले आहेत. त्यामुळे अशा माफियांविरोधात राज्य सरकारने पुढाकार घेत वाळू, दगड, मुरूम अशी गौणखनिजची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवून ती शासनाच्या महाखनिज ॲपशी जोडणे बंधनकारक केले आहे. मात्र, गाैणखनिज शाखा व तालुकास्तरावरील भरारी पथकांनी केलेल्या कारवायांमध्ये वाळू वाहतूकदार, खडी क्रशरचालक व खाणपट्टाधारकांनी वाहनांवर जीपीएस बसविले नसल्याचे आढळून आले. तसेच अवैध उत्खननाचे प्रकारही निदर्शनास आले. त्यामुळे अशा घटनांमध्ये प्रशासनाने संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. प्रशासनाने एप्रिल ते जून या काळात ८८ कारवाया करत त्यात १ कोटी ५८ लाख ४२ हजार ८७७ दंड केला आहे. तर १ ते ३१ जुलै या काळात सिन्नर व देवळा तालुक्यांत कारवाई करत त्यातून ७१ लाख ३ हजार ४५० रुपयांचा दंड करण्यात आला. १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या दीड महिन्यात दिंडोरी व सिन्नर या दोन तालुक्यांतून ६ वाहनांवर कारवाई झाली. यात ६ लाख ६१ हजार २८० रुपयांचा दंड केला. त्यानुसार प्रशासनाने अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना एकूण १ कोटी ८१ लाख ९९ हजारांचा दंड ठोठावला आहे. प्रशासनाने आतापर्यंत दंडाचे १ कोटी १५ लाख ७४ हजार ६४० रुपये संबंधितांकडून वसूल केले आहेत.

तालुकानिहाय दंडवसुली (लाखांत)

नाशिक २६,२७,३२५

दिंडोरी ३१,८८,९४५

पेठ १,३८,२००

इगतपुरी १२,८९, ६५५

निफाड २३,३१,६७२

सिन्नर २३,२३,९२५

येवला ६,४३,८००

नांदगाव २, ६५, ८४०

कळवण २, ५५, ४००

बागलाण ११, ६४,०१६

मालेगाव ३८, ०२५,

चांदवड २३,६८,९५०

देवळा १२,२१,८३४

एकूण : १,८१,९९,

हेही वाचा:

The post नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली appeared first on पुढारी.

Exit mobile version