
नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदूरशिंगोटे येथील साई सोनाई व जाई पार्क हॉटेलमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीसंदर्भात माहिती मिळताच वावी पोलिसांनी या दोन्ही हॉटेलवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच बसंत कुमार बिसवाल (रा. भातपुरा, भद्रक, ओडिसा, हल्ली रा. नांदूरशिंगोटे) व जगन शिवराम शेळके (रा. नांदूरशिंगोटे) यांना अटक केली.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली वावी पोलिसांनी कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. नांदूरशिंगोटे परिसरात साई सोनाई व जाई पार्क हॉटेलमध्ये अवैधरीत्या दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ या दोन्ही हॉटेलवर छापा टाकून देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच बसंत कुमार बिसवाल व जगन शिवराम शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी अवैध दारू कोणाकडून आणली याबाबत शोध घेऊन पोलिस त्याच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी दिली. वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्यास 9423468992 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील कोते यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी
- MP Rahul Shewale : खा. शेवाळेंनी आरोप केलेल्या तरुणीचे ट्विट चर्चेत, “मला न्याय हवा आहे …”
- नाशिक : सुरळीत विजेसाठी शेतकर्यांचा ठिय्या; अन्यथा मरणाची परवानगी द्या
The post नाशिक : अवैध दारू विक्रेत्यांवर छापा appeared first on पुढारी.