नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील अशोकामध्ये ‘वर्ल्ड स्पेस वीक’ला प्रारंभ

अशोका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या सर्व शाखांमध्ये ‘वर्ल्ड स्पेस वीक’ या खगोलशास्त्रीय उपक्रमास सुरुवात झाली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू राहील. हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या व जागतिक अवकाश संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवजातीच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा या हेतूने आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येतो.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. हा उत्सव शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. यासाठी सर्वप्रथम नावनोंदणी आवश्यक आहे. या उपक्रमात नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अशोका येथील अद्ययावत खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेच्या सुविधांचा लाभ घेता येईल. वर्ल्ड स्पेस वीक उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, कविता स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, ॲनिमेशन, खगोलशास्त्रीय प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रदेखील प्रदान केली जातील. त्याचबरोबर इस्त्रो या संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबर ऑनलाइन पद्धतीने संवाद साधण्याची संधीदेखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशोका एज्युकेशन फाउंडेशन ही इस्रो अधिकृत एक मान्यता प्राप्त अवकाश शिक्षण संस्था आहे. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांची खगोलशास्त्र व अवकाश संशोधन क्षेत्रातील आवड ओळखून त्यासंबंधी अधिकाधिक ज्ञान देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील अशोकामध्ये ‘वर्ल्ड स्पेस वीक’ला प्रारंभ appeared first on पुढारी.