नाशिक : आई वडिलांचा एकच टाओ ! हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात पाचवर्षीय चिमुकली ठार

प्राण्याच्या हल्ल्यात मुलगी ठार,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा 

चांदवड तालुक्यातील निमोण येथील सेजल सोमनाथ जाधव (वय ५) हिला हिस्त्र प्राण्याने ठार मारल्याची घटना घडली आहे. सकाळी घराजवळ खेळत असताना झाडाझुडुपांमधून आलेल्या हिंस्त्र प्राण्याने सेजलला शेतात नेत ठार केले. या घटनेने संपूर्ण निमोण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

निमोण गावच्या शिवारात सोमनाथ जाधव कुटुंबियांसमवेत राहतात. बुधवार (दि. २५) रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी सेजल ही घराबाहेर खेळत होती. यावेळी मागच्या बाजूने आलेल्या हिंस्त्र प्राण्याने तिला उचलून कांद्याच्या शेतात नेले. हिंस्त्र प्राण्याने शरीराचे लचके तोडल्याने चिमुकल्या सेजलचा जीव गेला. घरच्यांना उशिरा सेजल दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तिचा शोध घेतला, यावेळी सेजल कांद्याच्या शेतात मृत अवस्थेत दिसून आली. यावेळी सेजलच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडला.

या घटनेची माहिती मिळताच सरपंच डॉ. स्वाती देवरे, डॉ. भाउराव देवरे यांनी घटनास्थळी पोहचून वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना पंचनामा करण्यास बोलवले.

हेही वाचा : 

The post नाशिक : आई वडिलांचा एकच टाओ ! हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात पाचवर्षीय चिमुकली ठार appeared first on पुढारी.