
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्र्यंबकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये बळजबरीने घेऊन जात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मजहर अन्वर खान यांने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दि. २ एप्रिल ते ४ एप्रिल 2022 या कालावधीत त्र्यंबकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कलम सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- चंद्रपूर : दोन दिवसांपासून पुरात अडकलेल्या २२ ट्रक चालकांना सुखरूप बाहेर काढले
- कात्रज घाटात पुन्हा दरड कोसळली
- नगर जिल्ह्यात तेरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश
The post नाशिक : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी ; हॉटेलमध्ये नेऊन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.