Site icon

नाशिक : आज आहे हृदयदिन…..‘वोक्हार्ट’ केली जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जागतिक हृदयरोग दिनाचे औचित्य साधून वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकवर जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी स्वत: हृदयच मॅस्कोटच्या रूपात येऊन स्ट्रेच बॉल्सचे वाटप करून नागरिकांशी संवाद साधू लागले. तसेच योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत जनजागृतीही केली.

जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. अशात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वोक्हार्टतर्फे अनोखा उपक्रम राबविला गेला. निरोगी हृदयासाठी आवश्यक आहार, व्यायाम या बाबींवर मार्गदर्शन करीत लक्ष वेधले. धावपळीचे जीवन, बदललेला आहार याचा थेट परिणाम हृदयावर होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याबाबत वोक्हार्टच्या केंद्रप्रमुख डॉ. रेश्मा बोराळे म्हणाल्या की, आजच्या युगात हृदयरोग हा घराघरांत पोहोचला आहे. लोकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, प्रत्येकाने त्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. योगेश मेटकर म्हणाले की, मॉर्निंग वॉक हा माझा नित्यक्रम असून, आजचा दिवस खरोखरच अविस्मरणीय ठरला आहे. यावेळी नागरिकांकडून वोक्हार्टचे आभार मानण्यात आले.

हेही वाचा:

फोटो मेलवर सेंड केला

The post नाशिक : आज आहे हृदयदिन.....‘वोक्हार्ट’ केली जनजागृती appeared first on पुढारी.

Exit mobile version