
सातपूर : पुढारी वृत्तसेवा
संदीपनगर परिसरातील खासगी शाळेत ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमाप्रसंगी माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर (८१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
चंद्रभान मालुंजकर यांनी १९६२ च्या युद्धात सहभाग नोंदवला होता. संदीपनगर येथील शाळेत सोमवारी (दि. ८) ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मात्र, मौले सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शाळा परिसरात सकाळी ९ वाजता प्रभातफेरी काढल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. राष्ट्रगीत संपल्यावर त्यांना भोवळ आल्याने ते खाली पडले. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता अपस्मारामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. १९६२ च्या युद्धातील ते एक शूर सैनिक म्हणून मालुंजकर यांनी निवृत्तीनंतर सातपूर परिसरात माजी सैनिक संघटनाच्या माध्यमातून नवयुवकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सातपूर परिसरातही भाजप पक्षाचे ज्येष्ठ संघटक पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा:
- नगर : सप्ताहातून फुलते जाती-भेदापलीकडे नेणारे तत्त्वज्ञान
- वडगाव मावळ : पवना बंदिस्त जलवाहिनीची टांगती तलवार
- पिंपरी : दोन वर्षांनी गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी; शहरात दहीहंडी फुटणार जोरात
The post नाशिक : 'आझादी का अमृतमहोत्सव' कार्यक्रमात माजी सैनिक मृत्युमुखी appeared first on पुढारी.