
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
चांदवड शहरातील आठवडे बाजार तळ्यात मंगळवार (दि.२३) रोजी सकाळच्या सुमारास ५५ ते ६० वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत चांदवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत व्यक्तीचा मृतदेह चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. मयत व्यक्तीचा रंग – काळा सावळा, केस – सफेद, दाढी वाढलेली सफेद केस असलेली, गळ्यात रुद्राक्ष व तुळशी माळ, दोन्ही हातात रुद्राक्ष माळ, उजव्या हाताचे दोन बोटात लोखंडी धातूच्या अंगठ्या घातलेल्या, अंगात सफेद रंगाचा फुल बाहिचा शर्ट, त्याखाली भगव्या रंगाची कोपरी, सफेद रंगाची पायजमा लेंगा पॅन्ट असे वर्णन आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास चांदवड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार मन्साराम बागुल, अमोल जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा:
- अभिनेत्री सोनम पिंक आऊटफिटमध्ये फेमिनाच्या रेड कार्पेटवर चमकली
- जामखेड पाणीयोजना फेरनिविदांच्या फेर्यात! दुसर्यांदा मागविली निविदा; एजन्सी निश्चित होईना
- Ruchira Jadhav : उसे मालूम था की मुझे इश्क हैं उससे…
The post नाशिक : आठवडे बाजाराच्या तळ्यात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह appeared first on पुढारी.