नाशिक : आढावा बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ यांची नांदगावी भेट

नांदगाव बैठक www.pudhari.news

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ यांनी नांदगावी तालुक्याला भेट देत गुरुवार, दि.12 रेाजी आढावा बैठक घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी हे देखील बैठकीस उपस्थित होते. सर्व विभागप्रमुख तसेच ग्रामसेवक ‌यांच्या विविध विषयांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकी दरम्यान घेतला.

बैठकीत गोल्डन कार्ड तसेच कमी व मध्यम वजनाची मुले,‌ अधिका-यांच्या भेटी, विविध बांधकामे, जलजीवन मिशन, पंधरावा वित्त आयोग, मनरेगाची कामे, लेखा विभागाचा आढावा, ग्रामसेवकाची कामे, सहायक प्रशासक आधिकारी व कनिष्ठ प्रशासक अधिकारी यांनी केलेल्या कार्यालयीन तपासण्या आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच ई. व्ही. रुम गटशिक्षणाधिकारी यांच्या पोस्टर कविता, वाॅटर कुलर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे बंजारा शब्दकोशाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात ‌आले. बचत गटाच्या स्टॉलला भेटी देत व बचत गटांना धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. गुरुवार (दि.12) घेण्यात आलेल्या दौ-यात जिल्हा परिषद शाळा बाणगाव येथे भेट देऊन त्यांनी मुलांशी मुक्तसंवाद साधला. मुलांना गणिते सोडवण्यास सांगितले तसेच‌ काही प्रश्नांची उत्तरे विचारत मुलांच्या प्रगतीचा आढावा मित्तल यांनी घेतला. मुलांनी देखील उत्तम प्रतिसाद दिल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी या बैठकीचे सुत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : आढावा बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल‌ यांची नांदगावी भेट appeared first on पुढारी.