
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्या नगरसेवकांच्या समर्थकांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश करत नाशिकमधील ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले आहे.
शहरातील शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयासमोर समर्थकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, सुवर्णा मटाले, अण्णा लवटे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी गोडसे, बोरस्ते यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला, तर मटाले यांनी, प्रवेशानंतर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असल्याचे सांगून, शहराबद्दल जाणीव ठेवणारे व शहराच्या विकासासाठी धडपडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहात असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा :
- महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी; १४४ कलम लागू
- बारामतीच्या कोयता गँगमधील तिघांना अटक
- कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक : प्रचंड चुरशीने 85 टक्के मतदान
The post नाशिक : आता 'त्या' माजी नगरसेवकांचे समर्थकही शिंदे गटात appeared first on पुढारी.