नाशिकच्या कळवण – सुरगाणा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्या कळवण – नांदुरी रस्त्यावरील पेट्रोलपंपाची काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.
पहाटे तीन वाजेच्या सुमारास 4 अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पेट्रोल न मिळाल्याने तोडफोड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सिसीटीव्हीच्या आधारे पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
हेही वाचा :
- नाशिक : डोळे आलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या सूचना
- नाशिक : ‘आय फ्लू’ झालेल्या विद्यार्थ्यांना चार दिवसांची सुटी
- अहमदनगर जिल्ह्यातील 20 हजार ओबीसींना घरकुले!
The post नाशिक : आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोलपंपाची अज्ञातांकडून तोडफोड appeared first on पुढारी.