नाशिक : ‘आयएमए’ पत्रकार पुरस्काराचे आज वितरण; ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांचा समावेश

दै. ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 9) दुपारी 4 ला आयएमए सभागृह, शालिमार, येथे शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यात दै. ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांच्यासह पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, सचिव डॉ. विशाल पवार, उपाध्यक्ष डॉ. किरण शिंदे, डॉ. गीतांजली गोंदकर यांनी दिली. पत्रकार गौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे उपस्थित राहणार आहेत. आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी धनंजय रिसोडकर, सचिन जैन, जहीर शेख, अरुण मलाणी, प्रवीण बिडवे, गायत्री जेऊघाले, धनंजय बोडके, अनिकेत साठे, रवींद्र केडिया, अतुल भांबेरे, आसिफ सय्यद, जितेंद्र येवले, रामदास नागवंशी, चंद्रशेखर गोसावी, आहुजा भारती, अजय भोसले, संतोष सोनवणे, प्रशांत सूर्यवंशी आदींचा गौरव करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. माधवी मुठाळ – गोरे, डॉ. शलाका बागूल, डॉ. प्रेरणा शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘आयएमए’ पत्रकार पुरस्काराचे आज वितरण; ‘पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांचा समावेश appeared first on पुढारी.