नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी

आरटीई www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरात शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव पंचवीस टक्के जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शुक्रवारी (दि.17) अखेरची संधी मिळणार आहे. त्यानंतर लॉटरीसह इतर प्रक्रिया होणार आहे. यंदा पालकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, उपलब्ध जागांच्या तुलनेत तिप्पट अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी मोठी रस्सीखेच आहे.

आरटीई कायद्यानुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी फेब्रुवारीत प्रवेशप्रक्रिया प्रारंभ झाला होता. आरटीईअंतर्गत यंदा राज्यातून 8 हजार 828 शाळांनी नोंदणी केली असून, त्यानुसार 1 लाख 1 हजार 969 जागा उपलब्ध आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 401 शाळांमध्ये 4 हजार 854 जागा उपलब्ध आहेत. 1 मार्चपासून प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आरटीईसाठी गुरुवारी (दि.16) सायंकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून 3 लाख 2 हजार 794 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील 18 हजार 115 अर्जांचा समावेश आहे. उपलब्ध जागेच्या तुलनेत तिप्पट अर्ज आल्याने लॉटरीवरच प्रवेशाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे लॉटरी कधी लागते? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील प्रवेशाची सद्यस्थिती
शाळा                  8,828
जागा                   1,01,979
प्राप्त अर्ज             3,02,794

हेही वाचा:

The post नाशिक : ‘आरटीई’साठी आज अखेरची संधी appeared first on पुढारी.