Site icon

नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणारी प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीकडे दुर्लक्ष केल्याने 50 टक्के जागा रिक्त आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रियेला दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता 15 मेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील 8 हजार 823 खासगी शाळांमधील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहेत. त्याकरिता 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले आहेत. 94 हजार 700 विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा सोडतीत केली आहे. सोमवारी (दि.8) सायंकाळपर्यंत 50 हजार 03 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर 51 हजार 843 जागा अद्यापही रिक्त आहेत. दरम्यान, प्रतीक्षा यादीत 81 हजार 129 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आता अ‍ॅडमिट कार्डची प्रिंट काढू नये. या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाल्यानंतर आरटीई पोर्टलवर अधिकृत सूचना देण्यात येतील. एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच प्रिंट काढण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले. आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘आरटीई’ प्रवेशासाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Exit mobile version