नाशिक : ”आरोग्य’ च्या मेडिकल कॉलेजसाठी ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय शिक्षणाची मातृसंस्था असलेल्या नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयासाठी 348 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

येथील वैद्यकीय महाविद्यालयास अतिरिक्त जागा देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठवलेला  आहे. ही जागा शासनाकडून विद्यापीठास वर्ग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून जागा हस्तांतरित होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवार (दि.3) सभागृहात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. त्यावरील उत्तरात या इमारतीच्या कामाची टेंडर प्रक्रिया आठ सुरु करण्यात येऊन लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आरोग्य विज्ञान विद्यापीठ मेडिकल कॉलेजसाठी ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाची टेंडर प्रक्रिया आठ दिवसात सुरु करण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर दीड ते दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : ''आरोग्य' च्या मेडिकल कॉलेजसाठी 'इतक्या' कोटी रुपयांचा निधी मंजूर; भुजबळ यांच्या तारांकीत प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद appeared first on पुढारी.