
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राजेंद्र बंगाळ (एम.डी. न्यायवैद्यकशास्त्र) रुजू झाले आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर यांनी बंगाळ यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. राजेंद्र बंगाळ हे 2021 पासून पुण्याचे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज येथे न्यायवैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. 1990 मध्ये नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस तसेच 1994 मध्ये न्यायवैद्यकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 1996 मध्ये नागपूर येथून एलएलबी व नवी दिल्ली एनबीई येथून डीएनबी पदवी घेतली आहे.
हेही वाचा :
- नर्हेतील पेट्रोल पंपावर दरोडा; कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली
- पुणे : ‘त्या’ विद्यार्थ्यांची पात्रता धोक्यात
The post नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. राजेंद्र बंगाळ appeared first on पुढारी.