नाशिक : इंदिरानगरमध्ये युवकाचा निर्घृण खून

Two people arrested for planning of murder in maval pimpri chinchwad pune

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : अत्यंत वर्दळीच्या इंदिरानगर भागात मंगळवारी (दि. ११) दुपारी दीड वाजेच्या सुमारास युवकाचा निर्घुण खून झाला. दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी एकाचा पाठलाग करित काही क्षणात त्याच्यावर सपासप वार केलेत. भरदिवसा झालेल्या थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव भागात एका घरात चोरीची घटना घडल्याने तिथे चौकशी सुरु होती. तेव्हा दुचाकी पडल्याचा आवाज झाला आणि सर्वांच्या नजरा तिकडे गेल्या. यावेळी स्कूटीवरुन (एमएच 41 बीके 4205) पडलेला तरुण सैरावैरा पळत होता. तर त्याच्यामागे दोन दुचाकीवरुन आलेले पाच-सहा तरुण पाठलाग करत होते. इंदिरानगरजवळील मसाल्याच्या दुकानासमोर त्या टोळक्याने युवकाला गाठत त्याचे कपडे फाडले आणि काही कळण्याच्या आत धारदार हत्याराने सपासप वार केले. दरम्यान हा तरुण निपचित पडला अन् हल्लेखोरांनी भरधाव वेगात पळ काढला. या घटनेची तत्काळ कॅम्प पोलिसांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठत तपासाची चक्रे फिरवली. यामध्ये मयत तरुणाचे नाव सुनील गुंजाळ असल्याचे सांगण्यात आले आहे. हा तरुण गवळीवाड्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर हल्ला करणारे देखील त्याच परिसरातील रहिवासी असल्याची चर्चा होती. भरदिवसा अंगाचा थरकाप उडविणार्‍या या घटनेने दहशतीचे वातावरण आहे.

The post नाशिक : इंदिरानगरमध्ये युवकाचा निर्घृण खून appeared first on पुढारी.