नाशिक : इंदिरानगरला बंद बंगल्यात तीन लाखांची चोरी

घरफोडी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर परिसरातील गणराज कॉलनीत बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तीन लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन वडगावकर (वय 55) यांचा आशीर्वाद बंगला २८ एप्रिल ते १ मेदरम्यान बंद होता. चोरट्याने ही संधी साधत घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने, मूर्ती व रोख रक्कम असा एकूण तीन लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल नेला.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्याहादे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : इंदिरानगरला बंद बंगल्यात तीन लाखांची चोरी appeared first on पुढारी.