नाशिक : इंदिरानगर भागात टवाळखोरांचा सुळसुळाट, पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

चोरी

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा वचकच राहिला नसून दिवसेंदिवस समस्येत वाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

इंदिरानगर परिसरातील राजीवनगर, विशाखा कॉलनी, एकता कॉलनी, राजीव टाउनशिप, भगवती चौक यासह विविध भागांत अनेक मोकळे भूखंड तसेच महापालिकेची उद्याने आहेत. या भागात दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी अनेक टवाळखोर येत असतात, उद्यानांमध्ये रात्रीच्या वेळी मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. उद्यानांमधील आसनव्यवस्था अन्य साहित्य चोरीला जात आहे. रात्रीच्या वेळी उद्यानांमध्ये तसेच मोकळ्या भूखंडांवर याच टवाळखोर मद्यपी गर्दुल्यांकडून रात्रीच्या वेळी मद्याच्या पार्ट्या होत आहेत. त्यामुळे परिसरात शिवीगाळ हाणामारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिकांनीही या ठिकाणी येण्या-जाण्यास पाठ फिरवली आहे. पोलिस येतात मात्र टवाळखोरांवर कारवाई न करताच माघारी निघून जातात. यामुळे पोलिसांचा धाकच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागात पोलिस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

माझ्या प्रभागात मी १५० सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे त्या भागात गुन्हेगारी कमी झाली आहे. इंदिरानगर भागात पोलिस गस्त वाढविली पाहिजे.

– सतीश सोनवणे, माजी नगरसेवक

हेही वाचा :

The post नाशिक : इंदिरानगर भागात टवाळखोरांचा सुळसुळाट, पोलिस गस्त वाढविण्याची मागणी appeared first on पुढारी.