नाशिक : ‘इंद्रधनुष्य-2022’ युवक महोत्सवाचा आज समारोप

इंद्रधनुष्य www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन ‘इंद्रधनुष्य – 2022’ युवक महोत्सवाला शुक्रवार (दि. 7) पासून प्रारंभ झाला. या तीन दिवस चालणार्‍या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. महोत्सवाचा समारोप रविवारी (दि. 9) मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘इंद्रधनुष्य – 2022’ युवक महोत्सवाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डॉ. एम. सी. अहिरे, डॉ. विश्वनाथ शिंदे, संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, स्माइल अ‍ॅण्ड स्पिनॅच संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंह चौहान, क्रीडा अधिकारी डॉ. डी. एम. गायकवाड, विद्यार्थी परिषदचे उपाध्यक्ष डॉ. ए. ए. अत्रे, आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख आदी उपस्थित होते. अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारच्या विविध स्पर्धा विद्यार्थी जीवनात आवश्यक असून, जिंकण्यापेक्षा स्पर्धेचा आनंद लुटण्याचा सल्ला डॉ. रसाळ यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. महावीर सिंह चौहान यांनीही मार्गदर्शन केले.

स्पर्धांमध्ये रंगत :
उद्घाटनानंतर महोत्सवात नऊ प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये शास्त्रीय गायन, एकांकिका, वाद-विवाद स्पर्धा, रांगोळी, क्ले मॉडेलिंग, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्यवादन, संगीत, प्रश्नमंजूषा व शास्त्रीय नृत्य आदींचा समावेश होता. शनिवारी (दि. 8) पाश्चात्य समूह गीत, शास्त्रीय नृत्य लोकनृत्य, स्किट, मूर्तिकला, कोलाज, इन्स्टॉलेशन, गायन, उपशास्त्रीय गायन, सुगम गायन, वाद्यवादन, तंतुवाद्य वादन आणि वाद्यवादन स्पर्धा आयोजन केले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘इंद्रधनुष्य-2022’ युवक महोत्सवाचा आज समारोप appeared first on पुढारी.