Site icon

नाशिक : इगतपुरीतील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, १७ जखमी, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात रविवार, दि. 1 मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

कारखान्यात आगीने रौद्ररूप धारण केल्याने इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातून दूरवरुनही आगीचे लोळ दिसून आले. या घटनेत जीवितहानी झाली आहे. इगतपुरी तालुक्यासह विविध नाशिकच्या भागातून अग्निशमन यंत्रणा सक्रिय काम करीत आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या प्रकाराने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत. कंपनीच्या परिसरात कामगार व नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली असून कंपनीच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत.

The post नाशिक : इगतपुरीतील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, १७ जखमी, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर appeared first on पुढारी.

Exit mobile version