
नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी शहरात भरदिवसा सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव रोडवरील फ्लॅट चोरट्यांनी फोडत रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरातील तळेगाव रोड भागातील वास्तू द्वक्झरीया या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये दि. २६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चोरट्यांनी बंद असलेला फ्लॅटच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक व कडीकोयंडा फोडून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सोमनाथ फाळके यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटाचे तिजोरीतील २० हजारांची रोख रक्कम, ७५ हजार रुपये किमतीच्या २ सोन्याच्या बांगड्या, २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, ८ ग्रॅम वजनाचे नेकलेस, ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २० रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, १२ हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे टॉप्स, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, १५ हजार रुपये किमतीचे चांदीचा गडवा व पैंजण असे एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. इगतपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक फिंगरप्रिंट एक्स्पर्ट टीम, क्राइम ब्रँचने तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा :
- नगर : नैसर्गिक ओढे बुजविल्यानेच पूरस्थिती
- पुणे : नव्या मुगाच्या आगमनामुळे दरात घसरण; राजस्थान मटकीही उतरली
- महाबळेश्वर : शहर विकास आराखडा नव्याने सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
The post नाशिक : इगतपुरीत भरदिवसा घरफोडी, 'इतक्या' लाखांची चोरी appeared first on पुढारी.