नाशिक : इगतपुरीमध्ये महिलेची हत्या करून आरोपी फरार

हत्या www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी शहरात एका मुस्लीम समाजाच्या महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शहरातील गेल्या सात महिन्यातील ही तिसरी घटना असुन या महिलेची हत्या करून आरोपी फरार झाले आहेत.

गुरुवार (दि.१८) मध्यरात्रीच्या सुमारास विवाहित महिला जकीया शेख (रा. गायकवाड नगर) या परिसरात झालेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, या वादामध्ये आरोपीने शेख यांच्यावरच धारदार शस्त्राने वार करत खून केला. या हत्येत ७ आरोपी सामील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांनी पाहणी केली असुन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण असुन पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : इगतपुरीमध्ये महिलेची हत्या करून आरोपी फरार appeared first on पुढारी.