नाशिक : इगतपुरी तालुक्यात सरपंच, ग्रामसेविकेसह तिघांना लाच घेताना अटक

नाशिक

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील सरपंच, ग्रामसेविका व माजी सरपंचाला लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ७) दुपारी रंगेहाथ पकडले. शिपाई म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून देय असणारी एक लाख ६४ हजारांची रक्कम देण्याच्या बदल्यात या तिघांनी ५० हजारांची लाच मागितली होती.

सरपंच हिरामण दुभाशे (वय २५), ग्रामसेविका आशा गोडसे (वय ३७) आणि माजी सरपंच मल्हारी गटखळ (वय ५६) हे टाके घोटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लाच घेताना लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले. या प्रकरणात ६० वर्षीय तक्रारदाराने थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती. इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस निरीक्षकासह सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : इगतपुरी तालुक्यात सरपंच, ग्रामसेविकेसह तिघांना लाच घेताना अटक appeared first on पुढारी.